
नाशिक (प्रतिनिधी ) नाशिकरोड येथील रहिवासी असलेले महाराष्ट्राचे सुप्रसिध्द सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील समाज भूषण, लेखक,कवी,सामाजिक कार्यकर्ते मा.कैलास तेलोरे तसेच साहित्यिक, लेखक, कवी, पत्रकार मा. रत्नदीप जाधव(राजरत्न) हया दोन्ही मित्रांच्या वाढदिवसा निमित्त, पद्मतारा सामाजिक शैक्षणिक बहुउद्देशीय संस्था नाशिकरोड, आणि महाराष्ट्र सांस्कृतिक कला अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने, ठिकाण:-सिटी आर्केड,हॉल, महावीर किराणा स्टोअर्सवरती, पाण्याची टाकीच्या पुढे, शिवाजीनगर,जेलरोड,नाशिकरोड.येथे काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.सदर कवी संमेलनात जेष्ठ आणि नवोदित कवींनी आपला सहभाग नोंदवून एकापेक्षा एक सरस काव्य रचना सादर केल्या.याप्रसंगी कवी संमेलनात शाहिर कवी विजय भोळे,कवी पद्माकर जाधव, कवी राजेंद्र सोनवणे,कवी अशोक भालेराव, आदी कवींनी रसिकांची दाद मिळवली.काव्यसंमेलनाचे अध्यक्षस्थान जेष्ठ कवी विष्णू नारायण भटकर. कांदबरीकार कवी अनिल मनोहर यांनी भूषविले.प्रमुख पाहुणे पद जेष्ठ कवी रंगराज ढेंगळे, कवी:-रविकांत शार्दुल,सामाजिक कार्यकर्त्या प्रमिलाताई मैंद,अनिताताई आहिरे, यांनी भूषविले.सुत्र संचालनाची धूरा गायक रविंद्र बराथे,कवी किरण लोखंडे, कु.श्रध्दा मालुंजकर, यांनी सांभाळली.कवी:-अशोक भालेराव.कवी:-किरण लोखंडे.कवी:-अविनाश वाघ सर.कवी:-पद्माकर जाधव.चित्रपट सृष्टीचे जेष्ठ दिग्दर्शक अभिनेते, पत्रकार पोपटराव कांबळे.कवी:-अरूण घोडेराव,अभिनेते:-हर्षेंद्र जाधव. हार्मोनियम मास्टर भारत भालेराव,आदी कलाक्षेत्रातील महिला पुरूष कलावंत, विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांचा सत्कार शाल, पुष्प,व सन्मानपत्र प्रदान करुन करण्यात आला!
