
प्रणाली देशमुख
आयुष्याच्या कोऱ्या कॅनव्हासवर, सुखदुःखाची ‘आउटलाइन’ अधोरेखित करत, वृत्तबद्ध कवितेची नस लेखणीच्या चिमटीत अलगद पकडून, मुक्तपणे वावरणाऱ्या फोटोवेड्या, हळव्या अन् सुंदर सखी कडून ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहावरील अभिप्राय आलाय…या अभिप्रायाला मैत्रीचा सुगंध असला तरी तो तितकाच मनातून आणि कवितेतील भावना अलगदपणे सांभाळून आलाय… खूप धन्यवाद प्रणाली...
वंशावळीच्या प्राचीन सरीतून हा कवितासंग्रह जेव्हा वाचायला घेतला तेव्हा जे पान उघडेल ती कविता वाचली,प्रत्येक कवितेत बाईपणाची एक कथा लपलेली जी स्त्री मनाचे कितीतरी पदर उलगडते,बाईच्या कुळातून पिढ्यादरपिढ्या झिरपत येते बाई पणाची एक मुक्त कविताएकाच आशयाचे वेगवेगळे संदर्भ घेऊन कवयित्रीने कुठेच आकडतांडव न करता , शब्दांची भडीमार न करता अतिशय अलवार पिढीजात दुःखाचा आशय आणि संदर्भ अधोरेखित केला आहे.ती शेवटी म्हणाली आवरते आता बराच पसारा झालाय अस्ताव्यस्त विखुरलेल्या मौन भावनांचा ….कदाचित मनाचा कोपरा अन् कोपरा व्यापलाय मौन भावनांनी, अगदी अस्ताव्यस्त कुणी आवरायला येणार नाही म्हणून कदाचित स्वतःच आवर सावर केलेली बरी…आर्त हाक असते मौनात, जी ऐकू येतेच असे नाही,नाजूक दिसणारी बाई किती कणखर आणि सशक्त असते जी विस्कटू देत नाही कुठल्याही संकटात स्वतःला,कवयित्रीने आयुष्याचा पसारा किती सहज मांडलाय शब्दात , निवडुंगाने गच्च मिठी मारावी तशी तुझी आठवण मला बिलगते अन् माझ्या कित्येक रात्री रक्तबंबाळ होतातविरहातली वेदना म्हणजे ही कविता बाकी निःशब्द….मी मला कळल्यानंतरही चिमूटभर उरते तीतू आहेस मी एक अपूर्ण कविता आणि तू एक संपूर्ण महाकाव्यतिच्यासाठी तो काय आहे यापेक्षा सुंदर कुणी लिहूच शकत नाही …प्रतिभा खैरनारचा हा कवितासंग्रह मुक्त छंद आणि अष्टाक्षरी स्वरूपात आहे,शब्दांचा गहिरेपणा, आशय ,संदर्भ अतिशय समर्पक आणि वास्तव चित्रण केलंय कवयित्रीने…भावनांची उकल विद्रोह, विरह, प्रेम, कुचंबना यापलिकडे ती जपत असते तिच्यातल्या स्त्रीत्वाला,अशा अनेक विषयांवर कवयित्रीने अतिशय हळुवारपणे अगदी सहज मोजक्या शब्दात आपल्या भावना मांडल्या , पुन्हा पुन्हा वाचत रहावं असं काही, संग्रह पाठवल्याबद्दल मनापासून धन्यवाद प्रतिभा, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि खूप सारं प्रेम तुला…प्रणाली देशमुख
