
लोहोणेर येथील जनता विद्यालयात होळी सणाच्या निमित्ताने होलिका पूजन करताना मुख्याध्यापिका संगिता सागर,पर्यवेक्षक आर.एच. देसले समवेत उपस्थित शिक्षक शिक्षकेत्तर सेवकवृंद.(छाया-सुनिल एखंडे)
लोहोणेर-(प्रतिनिधी):येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात होळी सणाच्या निमित्ताने होळीच्या पवित्र अग्नीत वाईट व कु विचारांचे दहन करण्यात आले. विद्यार्थ्यांना आपले सण उत्सव या विषयी माहिती व्हावी व ते का साजरे केले जातात त्या अनुषंगाने मुख्याध्यापिका संगिता सागर यांच्या प्रेरणेने आणि पर्यवेक्षक.आर. एच. देसले यांच्या मार्गदर्शनाखाली या होळीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना होळी सणाच्या निमित्ताने शालेय परिसर स्वच्छ करून स्वच्छतेचा संदेश दिला. शिक्षक अनिल शेवाळे यांनी होळी सणाची माहिती दिली तर सांस्कृतिक समिती प्रमुख सुनिल एखंडे यांनी होळी सणाचे महत्व सांगत सण उत्सव साजरे करत असताना त्याचे धार्मिक महत्व समजून घेतले पाहिजे असे सांगितले. शेवटी मुख्याध्यापिका संगिता सागर यांनी आपले मनोगत व्यक्त भारतीय संस्कृती ही जगातील महान संस्कृती आहे.या महान संस्कृतीत विविध सण उत्सव साजरे केले जातात त्यातील एक महत्वाचा सण म्हणजे होळी हा सण साजरा करण्यामागचा उद्देश सांगत विद्यार्थी म्हणून प्रत्येकाने आपल्या वाईट सवयी,वाईट विचार यांचे दहन करून चांगल्या सवयी आत्मसात केल्या पाहिजे त्याचबरोबर प्रत्येक सण उत्सव साजरा करताना तो पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले. मुख्याध्यापिका संगिता सागर व पर्यवेक्षक आर.एच.देसले यांच्या हस्ते होळीचे पूजन करून नैवद्य अर्पण करण्यात आला आणि होळी प्रज्वलित करण्यात आली.यावेळी होळी कशाची या शीर्षकाखाली वृक्षतोड न करणे,निरक्षरता अज्ञान,अंधश्रद्धा, अस्वच्छता,वाईट विचार,अभ्यास न करणे आदी आशयाचे फलक होळीला लावण्यात आले.कार्यक्रमाचे नियोजन ज्येष्ठ शिक्षक अनिल शेवाळे,छोटू वाघ,सांस्कृतिक समिती प्रमुख सुनिल एखंडे,रोहित पाटील,राकेश थोरात, शशिकांत ठाकरे, शशिकांत आहेर,विजय निकम,तुषार मोरे,कला शिक्षिका साधना साळुंखे आदींनी केले तर शिक्षकेत्तर सेवकवृंद सुरेश पवार,अमोल बोरसे,सनी आहेर, संदिप भामरे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांनी सहकार्य केले.
