
जव्हार (दिनेश आंबेकर) – : अपघात झालेल्या चालकाला जय हिंद चालक मालक संघटनेकडून रविवारी मदतीचा हात. जव्हार तालुक्यातील तसेच गुजरात सिमे लगत असलेल्या दादरा नगर हवेली बोर्डरवर असलेले रुईघर गावातील तसेच जय हिंद चालक मालक संघटनेचा सदस्य हा रात्री घरी येत असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने एका खाजगी जीपचा मोठा अपघात झाल्याची घटना होवून त्या जीप चालकाला सील्वासा येथे हॉस्पिटल मध्ये तात्काळ दाखल केल्यानंतर त्याचा उपचार खर्च मोठ्या प्रमाणात सांगितले असता संघटनेचे पदाधिकारी यांना ही गोष्ट कळताच त्यांनी मदत करण्याचे ठरवले. त्यामध्ये जय हिंद चालक मालक संघटनेचे पदाधिकारीनी ज्याला जे जमेल त्याप्रमाणे आपापसात थोडी थोडी रक्कम जमा करून दिनांक ११ मार्च रोजी सील्वासा हॉस्पिटलला जावून त्यांच्या कुटुंबीयांसोबत ४० हजाराची मदत करण्यात आले.

त्याठिकाणी ही मदत केल्याने त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले तसेच चालकाचे कुटुंबीय पत्रकाराची बोलताना सांगितले की ही सध्या आमच्याकडे एवढा खर्च करण्यासाठी पैसे नव्हते परंतु जय हिंद चालक मालक संघटनेने मदत केल्याने आमच्या डोक्यावरचा ओझ जरा कमी झाले आहे त्यामुळे या संघटनेचे आभार मानले.ही मदत जव्हार,मोखाडा ,विक्रमगड, वाडा येथील काही सहकाऱ्यांनी मदत केली आहे. ” त्यानंतर संघटनेचे कार्याध्यक्ष विश्वनाथ भोये यांनी सांगितले की येत्या काळात आम्ही चालक मालक संघटना ही मजबूत करू व आमच्या सहकारी बांधव यांना येणाऱ्या काळात कोणावर ही अशी परिस्थिती आली तरी आम्ही सगळे मिळून त्याला मदत करण्याचा प्रयत्न करू अशा विश्वास दिला.याप्रसंगी देवराम चौधरी अध्यक्ष ,दत्ता वाघ उपाध्यक्ष ,बाबू भोये, कांतिराम दिघा ,शंकर गोविंद,अरुण भोये,दीपक राऊत,महेश पवार हे उपस्थित होते.”
