
मोहाडी : (बातमीदार) मोहाडी येथील मविप्र समाज संचलित अभिनव बाल विकास मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी स्वकल्पनेतून पर्यावरण पुरक राख्या तयार करून अनोख्या पद्धतीने साजरे केले रक्षाबंधन.भारतीय संस्कृतीतील हा एक महत्त्वाचा सण असून बहिण – भावाच्या प्रेमाचा हा एक उत्सव असतो असे अभिनव मुख्याध्यापिका श्रीम.सोनाली देशमुख यांनी रक्षाबंधन सणाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी विद्यार्थिनींनी सर्व विद्यार्थ्यांच्या हातावर राख्या बांधल्या तर विद्यार्थ्यांनी सर्वांना भेटवस्तू दिल्या. राखी पौर्णिमेनिमित्त परिसरातील वृक्षांना राख्या बांधून पर्यावरण रक्षणाचा संदेशही देण्यात आला. अशा उपक्रमामुळे लहान मुलांमध्ये सर्जनशीलता व लहानपणापासूनच पर्यावरणाचे महत्त्व समजेल आणि जबाबदार नागरिक बनतील असे प्राचार्य श्री शिवाजी शिंदे यांनी सांगितले व मविप्र संचालक श्री प्रवीण नाना जाधव यांनी विद्यार्थांचे कौतुक केले. श्रीम.रोहिणी लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना राखी बनवण्यास मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अभिनव शिक्षक व शिक्षिका यांनी मेहनत घेतली.
