
नांदगाव (प्रतिनिधी) नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावर पूर्व भागात असलेल्या जातेगाव येथील बौद्ध विहारामध्ये दिनांक 8 ऑगस्ट 2025 रोजी शुक्रवारी दिव्यांग प्रहार शाखेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये नाशिक जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुकुंद तसेच नांदगाव तालुका अध्यक्ष अण्णा महाजन यांनी दिव्यांगांना मोलाचे मार्गदर्शन केले. या बैठकीच्या वेळेस घाटमाथ्यावरील सर्व दिव्यांग बांधव हजर होते. तसेच या बैठकीस जातेगाव ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब लाटे व राजू शेख यांनी आपली उपस्थिती दर्शवली. या बैठकीमध्ये जातेगाव दिव्यांग प्रहार शाखेचे अध्यक्ष म्हणून शांताराम जाधव यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून बापू पवार यांची निवड करण्यात आली. आणि सचिव पदी दादासाहेब पवार यांची निवड करण्यात आली. या बैठकीसाठी नांदगाव तालुका सचिव राजू कटारे कार्याध्यक्ष किशोर घोटेकर, दीपक सोळशे, आरिफभाई शेख, वर्षाताई गायकवाड यांच्या उपस्थितीत निवड केलेल्या सर्वांना नियुक्तीपत्र देण्यात आले व नांदगाव तालुकाध्यक्ष किरण भाऊ बोरसे यांनी जमलेल्या सर्व दिव्यांगाचे आभार मानले व पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
