
नांदगाव,(प्रतिनिधी )मराठा विद्या प्रसारक समाज संचलित जनता विद्यालय टाकळी बुद्रुक या शाळेत रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्याऔचित्य साधून रक्षा कसली केली जाते रक्षा कोणाची केली जाते आणि राखी का बांधली जाते या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना सांगण्यात आल्या तसेच सर्व विद्यार्थिनींनी भावांचे औक्षण करून त्यांना राख्या बांधल्या व मिठाई देत तोंड गोड केले सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अतिशय आनंदाने उत्साहाने साजरा झाला.
