
सरताळे (साकोरा)-आश्रम शाळा सरताळे येथे जागतिक आदिवासी दिवस व क्रांती दिवस साजरा. नांदगाव पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक मा.भदाणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवान बिरसा मुंडा, वीर एकलव्य, उमाजी नाईक, महात्मा गांधी, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आदींची प्रतिमा पुजन करून आश्रम शाळा सरताळे येथे जागतिक आदिवासी दिवस व क्रांती दिवस साजरा करण्यात आला.

सदर प्रसंगी मा. भदाणे साहेब यांनी उपस्थितीत विद्यार्थी व पालकांना क्रांती दिन, आदिवासी दिवस व रक्षा बंधनाचे महत्व सांगत विद्यार्थ्यांनी वीर एकलव्य यांचा आदर्श घेत गुरुनिष्ठा व अथक प्रयत्ननातून स्वतःला सिद्ध करण्याचे आवाहन केले. उपस्थितीत आदिवासी विद्यार्थी व पालकांना मोबाईलचे दुष्परिणाम सांगत अल्पवयीन मुलामुलींचे विवाह कायदेशीर दखलपात्र गुन्हा असल्याची जाणीव करून देत आपल्या समृद्ध संस्कृती,परंपरा व कलांची जतन करण्याचे आवाहन केले. सदर प्रसंगी आश्रम शाळेतील मुलींनी मुलांना राख्या बांधून तर संस्था कोषाध्यक्षा नम्रता पगार मॅडम यांनी पोलीस निरीक्षक सन्माननीय भदाणे साहेब यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला. तदनंतर आश्रम शाळेच्या मुलामुलींनी आपला पारंपरिक आदिवासी वेशभुषा, पेहराव परिधान करीत आपल्या आदिवाशी संस्कृतीचे दर्शन घडविणारे माऊची, वारली, कोकणी, भिलाऊ,कोळी, डोंगऱ्या देव इत्यादी नृत्यांचे सादरीकरण केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था सरचिटणीस रमेश अप्पा पगार होते तर संस्था कोषाध्यक्षा नम्रता पगार, किरण जाधव, दत्तात्रय सोनवणे, (पोलीस हवालदार)सचिन मुंडे, संतोष रणधीर,(पोलीस नाईक) सुनिता पाडवी, ओंकार सोनवणे विद्यार्थी पालक प्रतिनिधी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थितीत होते. सदर कार्यक्रम प्रास्ताविक आश्रम शाळा प्राचार्य समाधान चौधरी यांनी मांडले तर कार्यक्रम सुत्रसंचालन दिपक सुर्यवंशी व महेंद्र जाधव यांनी सांभाळले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रम समारोप करण्यात आला. सदर कार्यक्रमास विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं उपस्थितीत होते.कार्यक्रम यशस्वीते साठी सर्व शिक्षक, अधीक्षक, अधिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केलेत.
