
पांझणदेव (प्रतिनिधी) पांझणदेव | माध्यमिक विद्यालय पांझणदेव येथील विज्ञान व गणित विषयांचे शिक्षक व नांदगाव तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष तसेच इन्स्पायर अवॉर्ड मानक समन्वयक श्री. संजय जयश्री प्रभाकर बच्छाव यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत Ph.D. – ‘टू क्रेडिट कोर्स इन रिसर्च अँड पब्लिकेशन एथिक्स’ हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. या निमित्ताने माध्यमिक विद्यालय पांझणदेव व महादेव मंदिर पांझणदेव येथे त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात श्रीराम एज्युकेशन सोसायटी, छत्रे इंग्लिश स्कूलचे सचिव माननीय श्री दिनेश धारवाडकर, संस्थेचे संचालक माननीय श्री प्रसाद पंचवाघ, नांदगाव तालुका राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक श्री गुणेश गुजर सर, मुख्याध्यापिका वर्षा पाटील , मोहन कदम , अनिल गोरे , सचिन अहिरे . रवींद्र गायकवाड.बापूसाहेब पगारे.तसेच गावातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर यावेळी उपस्थित होते. सत्कार समारंभानंतर महादेव मंदिर परिसरात दहा वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी या वृक्षांचे संगोपन करण्याचे वचन दिले, ज्यामुळे पर्यावरणसंवर्धनाचे भान दृढ झाले.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
