
*गावदरा (. प्रतिनिधी ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावदरा येथे मोठ्या उत्साहात जागतिक आदिवासी दिन व रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळे आदिवासी पोशाख परिधान केलेले होते. आदिवासी गीतावर शाळेचे शिक्षक व विद्यार्थी यांनी छान नृत्य देखील सादर केले.ह्या कार्यक्रमात गावातील महिलांनी देखील सहभाग घेतलेला दिसून आला.यानंतर मुलींनी सर्व मुलांना राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम ही साजरा केला.यावेळी झाडांना राखी बांधून त्यांचे रक्षण करू अशी शपथ ही घेण्यात आली.गावदरा शाळेचे शिक्षक श्री विलास सोनवणे व मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी श्रीम. हर्षदा शिवदे मॅडम हे दोघेही राबवित असलेल्या नवनवीन व आनंददायी उपक्रमांमध्ये आणखी एका उपक्रमाची भर पडली. त्यांच्या ह्या उपक्रमामुळे गावकरी व शालेय व्यवस्थापन समिती गावदरा यांच्याकडून दोघांच्याही कार्याचे भरभरून कौतुक करण्यात आले. ह्या कार्यक्रमाच्या वेळी गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
