
दातली ( प्रतिनिधी)–माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर दातली या शाळेत रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने हस्तकला व कार्यानुभव विषयाच्या अंतर्गत *राखी बनवणे कार्यशाळा* हा उपक्रम घेण्यात आला. विद्यालयातील जवळपास *४००* विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला.राखी बनविण्यासाठी साठी लागणारे सर्व साहित्य विद्यार्थ्यांनी आपल्या सोबत आणले होते, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पर्यावरण पूरक राख्या रक्षाबंधन या दिवशी झाडांना व विद्यार्थ्यांना बांधण्यात येणार असून

*” झाडे वाचवा झाडे जगवा “* हा पर्यावरणाचा संदेश विद्यार्थ्यांना मनात रूजायला हवा या विचारातून व प्राचार्य इ.के.भाबड यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा आयोजित केली.कलाशिक्षक संजय भारस्कर , श्रीमती प्रणाली सानप व विद्यालयाच्या सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली भव्य स्वरूपात कार्य शाळा यशस्वीरीत्या संपन्न झाली , या उपक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

