
सिन्नर प्रतिनधी( सोमनाथ गिरी) -: मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘एक वृक्ष- एक राखी’ उपक्रमांतर्गत वृक्षांना पर्यावरणपूरक राख्या बांधून रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सिन्नर तालुका संचालक कृष्णाजी भगत मार्गदर्शनाखाली व मुख्याध्यापक रंगनाथ उगले, पर्यवेक्षिका जयश्री पगारे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थिनींनी सुंदर व आकर्षक पर्यावरणपूरक राख्या स्वतः तयार करून विद्यालय परिसरातील झाडांना बांधल्या. राखी झाडाला- संरक्षण निसर्गाला,राखी साजरी करा – पर्यावरणाशी मैत्री करा या घोषणेतून विद्यार्थिनींनी पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रंगनाथ उगले होते. यावेळी पर्यवेक्षिका जयश्री पगारे,सोमनाथ गिरी,विद्या ठाकरे,कल्पना शिंदे,सीमा गोसावी, डी. ए.रबडे,रेखा खंडीझोड आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्याध्यापक रंगनाथ उगले म्हणाले की, रक्षाबंधन हा सण केवळ भावंडांतील प्रेमाचे बंध जपणारा नसून संरक्षण, स्नेह व जबाबदारी यांचे प्रतीक आहे. आजच्या पर्यावरणीय संकटाच्या काळात सर्वांनी वृक्षाची काळजी घ्यावी. वृक्ष लागवड व संवर्धन करणे काळाची गरज आहे.कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समितीच्या वतीने करण्यात आले. सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख सुनिल ससाणे यांनी तर आभार प्रदर्शन जयश्री गोहाड मानले. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
