
**सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९९२ वा दिवस* प्रथम एखादे वाद्य शिकायचे झाले तर त्याच्या तारा सावकाश छेडाव्या लागतात. असे करता करता बोटांना हळूहळू सवय होते. मग प्रत्येक तारेच्या कंपनाकडे लक्ष न देता आपण सफाईने वाद्य वाजवू लागतो. तसेच आजची आपली सहज कर्मे ही आपण पूर्वी जाणीवपूर्वक केलेल्या कर्माचा परिपाक असतात.
*स्वामी विवेकानंद…* *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर १८ श्रावण (नभमास) शके १९४७*
★ श्रावण पौर्णिमा
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. ९ ऑगस्ट २०२५ ★ नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन
★ बलराम जयंती
★ अश्वत्थ मारुती पूजन
★ १९०१ मराठी रंगभूमीचे जनक विष्णूदास अमृत भावे यांचा स्मृतिदिन.
★ १९४५ जपानमधील नागासाकी शहरावर अमेरिकेने फॅटबॉय नावाचा अणुबाँब टाकला. ९०,००० लोक तत्क्षणी मृत्यूमुखी पडलेत.
★ ऑगस्ट क्रांती दिन.
★ जागतिक आदिवासी गौरव दिन.
★ आंतरराष्ट्रीय भूमीपूत्र दिन.
