
साकोरे (प्रतिनिधी ) तुझे माझे जमेना तुझ्या वाचून करमेना असेच नाते असते भावा बहिणीचे कितीही भांडले दोघे तरी वीण नात्यातील तुटेना असेच नाते आमच्या पेङकाई माता सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या माध्यमिक विद्यालय साकोरे येथे इयत्ता ५ ते १० वी च्या चिमुरङ्यांनी राखी पौर्णिमा साजरी केली . यावेळी विद्यार्थी यांनी बहिणीला पेन , पेन्सिल , रबर , कंपास बाँक्स , रेबीन भेट म्हणून दिल्यात सर्व वर्गशिक्षक पुनम बोरसे मँङम , बोरसे आर बी , सुरसे एस जी , बोरसे ए आर , भाबङ आर पी , बोरसे व्ही पी , बोरसे एस एस यांनी कार्यक्रम आयोजित केला तसेच मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी सर्व विद्यार्थी यांना मिठाई देऊन सणाच्या शुभेच्छा दिल्यात
