
जळगाव नेऊर ता. येवला. (प्रतिनिधी , नंदकुमार न्याहारकर). येथील मविप्र संचलित जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सैनिकांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. याप्रसंगी भारतीय सैन्य दलातील जवान मिलिंद जगन्नाथ गांगुर्डे, त्यांचे वडील जगन्नाथ गांगुर्डे, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक बाळासाहेब सोनवणे उपस्थित होते. विद्यालयाचे प्राचार्य आर.एस.पाखले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाचे उपप्राचार्य बी. के. ढेपले यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनींनी जवानांना औक्षण करून राख्या बांधल्या. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थिनींनी सर्व विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या. यावेळी सौ तुसे के पी, श्री पाटील एस बी, श्री पाटील एस व्ही, श्री शेळके एस पी, श्री. दुकळे एम एस, श्री जाधव ए एस, श्रीमती भारुड जे ए, श्रीमती बस्ते एस आर, श्रीमती पटेल एस इ, श्री शेजवळ एन व्ही, श्रीमती जाधव एस एम, श्री गायकवाड पी आर, सौ गायकवाड ए पी तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
