
.. नांदगाव.(प्रतिनिधी ) – मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हरित सेना या उपक्रमा अंतर्गत पर्यावरण रक्षणाचा संदेश देत झाडांसोबत रक्षाबंधनाचा उत्सव साजरा केला. विद्यालयातील हरित सेना प्रमुख गजेंद्र माताडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना पर्यावरण संरक्षणाबद्दल जनजागृती करणे , ‘वृक्षांना राखी बांधणे’ हा एक या चळवळीचा महत्त्वाचा आणि प्रतिकात्मक उपक्रम आहे. यामुळे झाडांचे संगोपन करणे आणि त्याचे महत्त्व समजून घेणे सोपे जाते. उपमुख्याध्यापक दीपक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना झाडे लावा, झाडे जगवा! हा संदेश दिला. मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी विद्यार्थ्यांना या उपक्रमातून लोक आणि निसर्ग यांच्यामध्ये एक भावनिक नाते निर्माण होते. झाडांना भाऊ मानून त्यांच्या रक्षणाचे जबाबदारी घेण्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे, हा उपक्रमाचा उद्देश आहे हे त्यांनी सांगितले. याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती काळे, उपमुख्याध्यापक दीपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
