
.नाशिक ( प्रतिनिधी ) देशभर सणांचा उत्सव असतो..कुटुंब एकत्र येतात, मिठाई वाटली जाते, बहिणी भावाच्या मनगटावर राखी बांधतात.पण देशाच्या सीमांवर आपला जीव धोक्यात घालून आपल्यासाठी लढणाऱ्या सैनिकांसाठी मात्र ‘सण’ म्हणजे काय, हेच विसरून जातात..त्यांचे एकमेव ध्येय म्हणजे राष्ट्र प्रथम..पण यंदा रक्षाबंधनाच्या निमित्ताने नाशिकमधून काही भावपूर्ण क्षणांनी हृदय जिंकले.

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या जु.स. रुंगटा हायस्कूलच्या एनसीसी गर्ल्स कॅडेटस, पुष्पावती रुंगटा कन्या विद्यालय,र.ज. चव्हाण बिटको गर्ल्स हायस्कूल,नाशिक रोड या तीनही शाळांमधील विद्यार्थिनींनी 7 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, नाशिक येथील जवानांना राखी बांधून त्यांच्यासाठी कृतज्ञतेचा आणि प्रेमाचा सण साजरा केला.यावेळी औक्षण, मिठाई आणि राखी यांच्या माध्यमातून या विद्यार्थिनींनी तुम्ही सीमेवर असलात तरी आमच्या हृदयात आहात..तुम्ही आमच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग आहात..असा संदेश उपस्थित जवानांना दिला..रक्षा बंधनाच्या निमित्तानेछोट्याशा पण भावनिक अशा समारंभाने विद्यार्थिनींनी दिलेले प्रेम, जिव्हाळा आणि आदर यामुळे उपस्थित सैनिक काहीसे भारावून गेले.आपल्या कुटुंबापासून दूर असतानाही असा आपुलकीचा हात पुढे येतो तेव्हा नवे बळ मिळते, नवसंजीवनी मिळत असल्याच्या भावना या सैनिकांनी व्यक्त केल्या..या कार्यक्रमात नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अश्विनीकुमार येवला, शालेय समिती अध्यक्षा सौ.पुरकर, तसेच

प्रमुख पाहुणे लेफ्टनंट कर्नल एम.एस.किरोलिया, सुभेदार मेजर प्रदीप सिंग, सुभेदार विनोद डोखरे,सुभेदार सचिन जगदाळे, गोरख सानप, मंडलिक बाबूजी, मुख्याध्यापिका जागृती टिळे, ज्योत्स्ना आव्हाड, प्रज्ञा महाले, आणि एनसीसी अधिकारी जयंत निकम, कलाशिक्षक स्वप्नील कट्यारे, श्रीमती कामिनी पवार, राजेश कायस्थ,नितीन भरसट तसेच ७ महाराष्ट्र बटालियन नाशिक पीआय स्टाफ व सिव्हिल स्टाफची उपस्थिती होती..राखी म्हणजे नुसता एक धागा नाही, ती आहे बांधिलकीची, प्रेमाची आणि सुरक्षिततेच्या वचनाची नाळ..सैनिको, हो..तुमच्यासाठीच हे सगळं..असे प्रतिपादन नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अश्विनीकुमार येवला यांनी या कार्यक्रमाप्रसंगी केले..
