
के के वाघ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि कम्प्युटर सायन्स कॉलेज सरस्वती नगर नाशिक येथे बदलत्या अभ्यासक्रमानुसार मायक्रोकंट्रोलर वर आधारित Embedded System साठी एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. अर्चना बेंडाळे बी.ओ.एस. इलेक्ट्रॉनिक सायन्स व विभाग प्रमुख संगणक विज्ञान यांनी या कार्यशाळेचा उद्देश व त्याची गरज याबद्दल प्रास्ताविक सादर केले. तसेच डॉ. व्ही. एम. सेवलीकर विश्वस्त व समन्वयक, के. के. वाघ शैक्षणिक संकुल सरस्वती नगर कॅम्पस यांनी उपस्थित सर्वांना के के वाघ शिक्षण संस्था कशा पद्धतीने तंत्रज्ञानाचा उपयोग करून रोजगाराभिमुख शिक्षणासाठी प्रयत्न करीत आहे याची माहिती देऊन कार्यशाळेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्राचार्य डॉ. संभाजी पाटील यांनी प्रोत्साहन पर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमध्ये मुख्य अतिथी म्हणून औद्योगिक क्षेत्रातील अनुभवी तज्ञ श्री चेतन चौधरी यांचे उपस्थित प्राध्यापकांना विशेष मार्गदर्शन लाभले तसेच श्री मुद्ददसर शेख व श्री गिरीश आव्हाळे यांनी Embedded System च्या सर्व प्रात्यक्षिकांचे समायोजन करून उत्कृष्ट पद्धतीने सर्व प्राध्यापकांना समाधान पूर्वक मार्गदर्शन केले.या कार्यशाळेसाठी नाशिक जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधून अनेक प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. हर्षल दंडगव्हाळ व प्रा. मयूर उशीर यांनी केले या कार्यशाळेच्या नियोजन आयोजनासाठी प्रा. पौर्णिमा जगताप ,प्रा. मीनल जाधव ,प्रा. अपूर्व कुलकर्णी , प्रा. शितल पवार , सौ निशिगंधा भालेराव व इतर सर्व प्राध्यापकांनी यशस्वी प्रयत्न केले.
