
सिन्नर (प्रतिनिधी सोमनाथ गिरी ) :- नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सिन्नर तालुका संचालक तथा सिन्नर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी गणपत भगत यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भव्य नागरी सत्कार सोहळा रविवार दिनांक १० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मातोश्री नर्मदा लॉन्स, भैरवनाथ मंदिरा शेजारी या ठिकाणी संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते प्रकाश भाऊ वाजे असतील .कृषी मंत्री ॲड माणिकराव कोकाटे, खासदार राजाभाऊ वाजे ,मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे , आमदार सत्यजित तांबे ,माजी आमदार सुधीर तांबे ,नाशिकचे माजी महापौर प्रकाश मते आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. भगत यांनी तालुक्यात शिक्षण, समाजकारण, राजकारण ,सांस्कृतिक आदींसह विविध क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कार्य केले आहे .त्यांच्या कार्याची दखल घेऊन सिन्नरकरांनी या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. तरी या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन विवेकभाऊ चांडक ,पुंजाभाऊ सांगळे, अण्णासाहेब गडाख ॲड पी.बी.चांदोरे ,राजेंद्र देशपांडे ,राजेंद्र पवार ,प्रमोद प्रकाश नवसे आदींसह सत्कार सोहळा समिती सदस्य यांनी केले आहे.
