
नांदगाव (प्रतिनिधी). 8 ऑगस्ट 2025 नांदगाव,भारतीय विद्या भवन, गिरधारदास मोहता विद्या मंदिर, हिंगणघाट, वर्धा या ठिकाणी आयोजित CBSE क्लस्टर 9th टेबल टेनिस टूर्नामेंट 2025. या स्पर्धेत नांदगाव येथील जे. टि.कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कूलच्या अंडर 19 च्या गटातील मुलांच्या टिम ला तिस-या क्रमांकाचे बक्षीस मिळाले. त्यात साईप्रसाद पाटील व आयुष पारखे या खेळाडूनी उत्कृष्ट खेळ खेळाचे प्रदर्शन केले. अंडर 19 मुलींच्या गटात श्रावणी गायकवाड, क्रांती इंगोले, ऋग्वेदा रावओनदरे व वैष्णवी खैरनार यांनी आपले खेळातील कौशल्य पणाला लावले. अंडर 17 च्या गटात साई जाधव, तन्मय जाधव, आणि अथर्व खटके यांनीही खुप छान खेळाचे प्रदर्शन केले.

वैयक्तिक गटात सर्वांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. त्यामध्ये श्रावणी गायकवाड व आयुष पारखे यांची राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धे साठी निवड झाली.सर्व सहभागी खेळाडूंना मार्गदर्शक म्हणून क्रीडाशिक्षक अशोक बागुल यांचे मार्गदर्शन लाभले. तर संघ व्यवस्थापक म्हणून सुषमा काळे यांनी काम पाहिले.सर्व सहभागी खेळाडूंचे व मार्गदर्शन शिक्षकांचे संस्थेचे चेअरमन श्री. सुनिलकुमार कासलीवाल, सचिव श्री. विजुभाऊ चोपडा, प्रमिलाताई कासलीवाल, सुशिलकुमार कासलीवाल, श्री. जुगलकिशोर अग्रवाल,रिखबचंद कासलीवाल, महेंद्र चांदीवाल, प्राचार्य श्री मनी चावला, मुख्याध्यापक श्री गोरख डफाळ तसेच श्री.विशाल सावंत ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खुप कौतुक व अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
