
नांदगाव (प्रतिनिधी) नांदगाव रेल्वे स्टेशनला लागून लोहमार्गावरून धावणारी मालगाडी चाळीसगाव ते नांदगाव होऊन मनमाडच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीला नांदगावच्या उड्डाणपूला नजीक लोहमार्ग क्रॉस करताना मालगाडीच्या डब्याचे आठ चाके घसरले सात वाजून आठ मिनिटांनी ही घटना घडली त्यानंतर रेल्वे प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करत रेल्वे प्रशासनाने आठ वाजून बावीस मिनिटांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली

यादरम्यान नांदगाव मनमाड ,भुसावळ, चाळीसगाव, इगतपुरी आदी ठिकाणी लोहमार्गावरील मालगाड्या आणि एक्स्प्रेस गाड्या सव्वा तास थांबविण्यात आल्या. रेल्वे कशा स्थानी याची दखल घेत तात्काळ मनमाड वरून अतिदक्षता यंत्रसामग्री बोलविण्यात आली तसेच शेकडो कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी बंदोबस्तात काम तात्काळ सुरळीत पार पाडले. दरम्यान मालगाडीचा शेवटचा डबा रुळावरुन घसरल्याने तात्काळ तो डबा खुला करुन इतर डबे इंजिनच्या साह्याने बाजूला काढण्यात आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
