
कृषी नायक संजय चांगदेव होळकर
लासलगाव ( प्रतिनिधी) देशातील कांदा लसूण आणि भाजीपाला संशोधनासाठी कार्यरत असलेल्या प्रतिष्ठित नॅशनल हॉर्टिकल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन या संस्थेच्या संचालक पदी लासलगावचे कृषी नायक संजय चांगदेवराव होळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे नवी दिल्ली येथे व्यवस्थापकीय समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर बीजेंद्रसिंग उपाध्यक्ष चौधरी शब्बीर सिंग पवार कृभको चे अध्यक्ष चंद्र पाल सिंह यादव व माजी केंद्रीय कृषिमंत्री मोहन भाई कुंदरिया यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक झाली संजय होळकर हे भाजीपाला व फळबाग सहकारी खरेदी विक्री संस्था मर्यादित वेफको लासलगाव येथे अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत शेतकरी हितासाठी सातत्याने योगदान देणारे नेतृत्व तसेच कृषी विकासासाठी त्यांची दूरदृष्टी पाहता देशपातळीवरील या मानाच्या संस्थेत त्यांची संचालक म्हणून निवड झाली आहे ही संस्था सुधारित तंत्रज्ञान उत्पादन पद्धती आणि संशोधन यांच्या माध्यमातून देशभरातील लाखो शेतकऱ्यांना मार्गदर्शन करते श्री होळकर यांच्या निवडीने नाशिक जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात मोठा गौरव प्राप्त झाला असून त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनचा वर्षाव होत आहे होळकर यांची ही निवड केवळ एक मानाचा टप्पा अशा देशाच्या कृषी क्षेत्राच्या भविष्यासाठी एक नवा आशावाद शेतकरी बांधवांसाठी घेऊन आला आहे. त्यांच्या या निवडीचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
