
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९९१ वा दिवस
एखाद्या मुद्द्यावर कोणी विरोध करत असेल तर ती व्यक्ती तुमच्या विरोधात आहे असा निष्कर्ष काढण्याची घाई करू नका. येथे ध्यानात असू द्या की शुचिता, धैर्य, आणि दृढतेने तेच यश शक्य आहे. आपल्याला लोकांना संघटित करण्याच्या कामात स्वतःला गुंतवून घ्यायचे आहे. आपल्याला माहीत आहे की संपूर्ण सृष्टी ही आपापसात जोडलेली आहे. एखादी व्यक्ती उच्च ध्येयाचा स्पष्ट दृष्टिकोन ठेवून काम करत असेल तर हळूहळू परिस्थिती आणि आजूबाजूचे लोकही उच्च विचार व उच्च मिशनचा भाग बनण्यासाठी परावर्तित होतात.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १७ श्रावण (नभमास) शके १९४७
★ श्रावण शुध्द /शुक्ल १४
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. ८ ऑगस्ट २०२५
★ १९३२ सुप्रसिध्द मराठी अभिनेते, संवाद लेखक, निर्माते, दिग्दर्शक दादा कोंडके यांचा जन्मदिन.
★ १९४२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबईच्या गोवालिया टँक (ऑगस्ट क्रांती) मैदानावर “चले जाव” चा ठराव मंजूर केला.
