

नाशिक (प्रतिनिधी)दि. ५.कोटीच्या कोटी उड्डाणे घेणाऱ्या साहित्य संमेलनांच्या विविध दबावांखाली गुदमरलेल्या मराठी भाषा व संस्कृतीचा श्वास मोकळा करत,गर्दीप्राधान्य टाळणाऱ्या व मराठी भाषा-संस्कृती समोरील विविध आयामी समकालीन आव्हानांचीगांभीर्याने चर्चा करणाऱ्या, अभ्यासक प्रधान सहभागाच्या, भाषा -संस्कृती केंद्री परिषदा वा संमेलनाच्या चळवळीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या, पहिल्या अखिल भारतीय मराठी भाषा-संस्कृती परिषदेचे आयोजन, नाशिकच्या कुसुमाग्रज विचार मंचाच्या वतीने व मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या सहकार्याने,मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या, गंगापूर मार्गावरील,मॅरेथॉन चौकातील, रावसाहेब थोरात सभागृहात शनिवार,९ ऑगस्ट व रविवार,१० ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे.परिषदेचे उद्घाटन शनिवार,९ ऑगस्टला सकाळी १० वा होईल.ज्येष्ठ कवी, साहित्यिक, संपादक, विचारवंत,भाषा अभ्यासक आणि मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीचे एक ज्येष्ठ अध्वर्यू, डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या दोन दिवसांच्या परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ कवी,भाषा अभ्यासक,राज्य मराठी विकास संस्थेचे माजी उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे एक पूर्वाध्यक्ष प्रा वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते होत आहे.मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲड नितीन बाबुराव ठाकरे हे या परिषदेचे स्वागताध्यक्ष आहेत.मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ किरण कुळकर्णी आणि राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ.श्यामकांत देवरे हे प्रमुख पाहुणे असतील.पूर्णपणे वेगळे प्रारूप असलेल्या या परिषदेतदोन विषयांवरील दोन परिसंवाद आणि दोन्ही दिवस मिळून मराठी भाषा, संस्कृती समोरील विविध आव्हानांची चर्चा करणाऱ्या एकूण १९ विषयावरील गटचर्चा यांचा कार्यक्रमात समावेश आहे.पहिल्या दिवशी एकाच वेळी दुपारी ३.३० ते सायं.६ या वेळेत, सहा ठिकाणी सहा वेगवेगळ्या विषयावर, वेगवेगळ्या सभागृहात या गटचर्चा होतील.तर दुसऱ्या दिवशी १३ ठिकाणी तेरा विषयावरील गटचर्चा सकाळी ९ ते १२ व दुपारी १ ते ३ अशा दोन सत्रात या गटचर्चा होतील.सर्व उपस्थितांपैकी ज्यांना ज्या विषयात रूची असेल त्यांना त्या त्या चर्चेत, निमंत्रितांच्या वक्तव्यानंतर सहभागी होत आपली मते नोंदवता येणार आहेत.परिषदेच्या समारोपा अगोदर होणाऱ्या समारोप सत्रात, चर्चा समन्वयक आप आपल्या गटातील चर्चांचे सार निवेदनही करतील.शनिवार,९ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता होणाऱ्या उद्घाटनानंतर, दुपारी १.३० वा.’ मराठीच्या अवनतीची कारणे ‘ या डॉ प्रकाश सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिसंवादात, डॉ प्रकाश परब ( मुंबई), व श्रीधर लोणी( पुणे), हे भाग घेतील.सूत्रसंचालन सुभाष सबनीस करतील.दुपारी ३.३० ते सायं.६ या वेळात एकाच वेळी, वेगवेगळ्या सभागृहात,सहा वेगवेगळ्या विषयांवर गटचर्चां होतील.चंद्रशेखर गोखले समन्वयक असलेल्या,’ मराठीच्या वृद्धीसाठी शासनाची उदासीनता ‘ या विषयावरील गटचर्चेत प्रमुख निमंत्रित सहभागी डॉ दीपक पवार भाष्य करतील.वसंतराव खैरनार सूत्रसंचालन करणार असलेल्या,’ मराठी माध्यमातून शिक्षण का?’ या विषयावरील गटचर्चेत निमंत्रित सहभागी डॉ दिलीप धोंडगे, रवींद्र मालुंजकर आणि बाळासाहेब वाकचौरे हे भाष्य करतील.’ विभागीय साहित्य संस्था केवळ साहित्य केंद्रीच का?’ या विषयावर निमंत्रित सहभागी डॉ अनुपमा उजगरे भाष्य करतील,तर समन्वयन हेमकांत पोतदार करतील.’ मराठीच्या उपयोजनांच्या क्षेत्रांची सद्यस्थिती ‘ याविषयावरील गटचर्चेत डॉ केशव सखाराम देशमुख भाष्य करतील, समन्वयन डॉ दिलीप पवार करतील.’ बृहन्महाराष्ट्रातील मराठी समाज आणि वास्तव ‘ या विषयावरील चर्चेत संजय बच्छाव(बडोदा ),भाष्य करणार असून विनायक रानडे समन्वयन करतील.’ विदेशतील मराठी ‘ याविषयावर लतिका भानुशाली बोलतील तर समनव्ययन सुदेश हिंगलासपूरकर करतील दुसरा दिवस रविवार,१० ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत’ मराठी आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, रोजगार,उन्नती, विकासाच्या संधींची भाषा कधी होणार? या विषयावरील दुसरा परिसंवाद विद्यागौरी टिळक यांच्या अध्यक्षतेखाली होईल.त्यात डॉ विलास चिंतामण देशपांडे (नागपूर), डॉ पंडित विद्यासागर, डॉ अ.पा.देशपांडे,अंजली ढमाळ (मुंबई) सहभागी होतील.सूत्रसंचालन सतीश बोरा करतील.याच वेळेत, वेगवेगळ्या सभागृहात एकूण १३ विषयांवर गटचर्चां होतील.’ मराठीला आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, रोजगार, विकास,संधी इ.ची भाषा करण्यासाठीचे मराठी विद्यापीठ आणि शासन’ या डॉ मिलींद कसबे(नारायणगाव) समन्वयन करणार असलेल्या गटचर्चेत प्रा मिलींद जोशी (पुणे) हे निमंत्रित सहभागी असतील.’ भाषा आणि संस्कृती: संबंध ‘ या विषयावरील गटचर्चेत डॉ रमेश वरखेडे आणि अमृता कवीश्वर हे निमंत्रित सहभागी भाष्य करतील, समन्वयन माधुरी माटे( नाशिक) या करतील.’ पदवी, पदव्युत्तर शिक्षणात मराठी विषय का नाही?’ या विषयावरील गटचर्चेत डॉ प्रमोद आंबेकर ( नाशिक) हे भाष्य करतील, एकनाथ पगार समन्वयक असतील.’ मराठी सक्तीचा कायदा: अंमलबजावणीची वस्तुस्थिती ‘ या विषयावर सुभाष सबनीस भाष्य करतील, सुशील शेजुळे समन्वयक असतील. ‘माध्यमातील मराठी’ या विषयावरील गटचर्चेत नितीन केळकर व स्वानंद बेदरकर भाष्य करतील,किरण सोनार समन्वयन करतील.’ मराठी भाषिक समाजाची मराठीबाबतची उदासीनता ‘ या विषयावर श्रीकांत बोजेवार,प्रा.सुनील हिंगंणे, डॉ विनोद गोरवाडकर,मनोहर विभांडिक भाष्य करतील, समन्वयक डॉ सुनील कुटे असतील.’ मराठी: काय करावे?’ या विषयावरील प्रसेनजित गायकवाड समन्वयक असलेल्या गटचर्चेत डॉ भास्कर डोके,संजय बच्छाव (बडोदा),महेश दाबक, अनुराधा मोरे हे भाष्य करतील.’ भाषा विज्ञान ‘: उपेक्षित विषय का?’ या विषयावरील गटचर्चेत प्रकाश निर्मळ भाष्य करतील, समन्वयन डॉ दिलीप धोंडगे करतील.’ साहित्य केंद्री शिक्षणाऐवजी भाषा केंद्री शिक्षणाची गरज’ या विषयावरील गटचर्चेत स्वाती राजे भाष्य करतील, समन्वयन डॉ कपूर वासनिक (बिलासपूर) हे करतील.’ अनुवाद: मराठीतून इतर भाषांमध्ये ‘ या विषयावरील गटचर्चेत उमा कुळकर्णी,विलास पोतदार, डॉ विलासकुमार देशमुख भाष्य करतील,विवेक उगलमुगले समन्वयक असतील.’ संस्कृती आणि लोकसंस्कृती ‘ या गटचर्चेत डॉ गणेश चंदनशिवे भाष्य करतील, शैलेश पाटोळे समन्यक असतील.’ मराठी भाषा आणि बृहन्महाराष्ट्रातील संस्कृती ‘ या विषयावर डॉ गुरैय्या स्वामी( गुलबर्गा) हे भाष्य करतील,सतीश बोरा समन्वयन करतील.’ धर्म आणि संस्कृती: परस्पर संबंध ‘ या विषयावर संजीव भागवत भाष्य करतील, समन्वयन कविता शिंगणे गायधनी करतील.दुपारी ३ ते ४ या वेळेत सर्व गटचर्चांचे सार निवेदन सर्व गट चर्चांचे समन्वयक करतील.समारोप सत्रपरिषदेचा समारोप,१० ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता,परिषदेचे अध्यक्ष डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या अध्यक्षतेखाली होईल.या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे एक पूर्वाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, शालेय शिक्षण मंत्री ना.दादा भुसे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना.माणिकराव कोकाटे तसेच राज्य मराठी विकास संस्थेच्या उपसंचालक अंजली ढमाळ आणि दत्तात्रय कराळे, विशेष पोलीस महानिरीक्षक,नाशिक,हे उपस्थित राहतील.परिषदेसाठी नोंदणी करणाऱ्या बाहेरगावच्या प्रतिनिधींची निवास, भोजन व्यवस्था परिषदेतर्फे करण्यात आली आहे.या पहिल्याच ऐतिहासिक स्वरूपाच्या या परिषदेला मराठी भाषा-संस्कृती प्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावे अशी विनंती कुसुमाग्रज विचार मंचचे अध्यक्ष सतीश बोरा, उपाध्यक्ष दिलीप बारवकर, सरचिटणीस सुभाष सबनीस, खजिनदार जयप्रकाश मुथा तसेच सुहासिनी वाघमारे,सुमती पवार,शिरीष देशपांडे, नंदकिशोर ठोंबरे,प्रकाश शिंपी व अभय ब्रह्मेचा यांनी केली आहे.कृपया आपल्या वृत्तपत्रात प्रसिद्धीसाठी
