
स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना अमोल कुलकर्णी. समवेत सुनंदा गोसावी, जयराम कुलकर्णी आणि सुरेश पारुंडेकर.
नाशिकरोड: परस्परावलंबन, परस्पर सहकार्य, समायोजन लक्षात घेण्याबरोबरच परस्पर सहसंबंध निकोप आणि आनंदाचे होण्यासाठी मानसिक विकासक खेळ गरजेचे आहेत. अशा मानसिक आणि बौद्धिक खेळांद्वारे मेंदूच्या कार्यक्षमतेत निश्चितच वाढ होते, असे प्रतिपादन प्रसिद्ध मानसविकास तज्ज्ञ अमोल कुलकर्णी यांनी केले. शिखरेवाडीतील स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्था आणि मनोवेध डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने फाऊंडेशनचे अध्यक्ष अमोल कुलकर्णी यांचे विविध बौद्धिक आणि मानसिक खेळांची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जयराम कुलकर्णी होते. उपस्थित ज्येष्ठांची तीन गटात विभागणी करण्यात आली आणि शारिरीक विशिष्ट हालचालींवर आधारित ज्येष्ठांच्या साखळीद्वारे पहिल्या ते शेवटच्या ज्येष्ठांपर्यंत योग रितीने पोहचले का? यांचे परीक्षण करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. जंगलातील प्राणी, वनस्पती यांच्या सहाय्याने विविध मनोरंजनात्मक आणि समयसूचकतेसंबंधी माहिती देण्यात आली. कार्यक्रमाध्यक्ष जयराम कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात अशा उपयुक्त कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यासंबंधी मनोदय व्यक्त केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष सुनंदा गोसावी, सचिव अविनाश गोसावी, उपसचिव रवींद्र चंद्रात्रे, उपसचिव श्रीकांत मोहरील, उपखजिनदार परमेश्वर चिंतकिंदी, आधारस्तंभ वसंत उपासनी, अनिल सहस्त्रबुद्धे, सुधाकर सोनवणे, सी.आर.बोराडे, शास्त्री, ॲड.गोविंद पांडे, राम कुलकर्णी, शरद जोशी, रेखा जहागिरदार, मेखला रास्वळकर, शालिनी डहाळे, मृणाल प्रभुणे, कल्पना वैद्य, सुधा डमरे, वीणा जोशी, मंगल मोहरील, अर्चना सहस्त्रबुद्धे यांनी विशेष परिश्रम घेतले. माजी उपाध्यक्ष सुरेश पारुंडेकर यांची विशेष उपस्थिती होती. सुधा कुलकर्णी यांनी त्रिवार ॐकार आणि गुरुवंदनेसह सूत्रसंचालन केले. वैजयंती चंद्रात्रे यांनी आभारप्रदर्शन केले.
