
नांदगाव ! नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावर पूर्व भागात असलेल्या बोलठाण पासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील रोहिले बुद्रुक येथे ग्रामपंचायतने घेतलेली वादळी झाली असून काही नागरिकांनी बिन बुडाचे आरोप केले असल्याची माहिती समोर आली असून काही नागरिक गाव विकतेच्या मार्गावर आहेत की काय असा प्रश्न काही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथे दिनांक 4 ऑगस्ट २०२५ रोजी सोमवारी रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीने ग्रामसभा आयोजित केली होती. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच ठकुबाई देविदास पवार या होत्या तर सचिव म्हणून ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी मगर हे होते. या ग्रामसभेला जास्तीत जास्त वीस ते पंचवीस नागरिक उपस्थित होते. सचिन मच्छिंद्र गायके यांनी ग्रामसभेत शासनाच्या प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेबाबत मुद्दा उपस्थित करून आमचे घरकुले रद्द का केले? गावातील काही एकत्रित कुटुंबांना दोन ते तीन घरकुलांचा लाभ तसा दिला? आम्हालाच का डावण्यात येत आहे असे विविध प्रश्न उपस्थित करून बिनडाचे आरोप केल्याचे दिसून आले. यावर ग्राम पंचायत अधिकारी व सरपंच यांनी सांगितले की आम्ही शासनाच्या नियमाप्रमाणे आदेशावरून प्रधानमंत्री आवास प्र पत्रक ड मधून नावे रद्द केले आहेत. तुम्हाला लाभ घ्यावयाचा असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शासनाचे आदेश व नियम डावलुन अपात्र लाभार्थ्यांची नावे पात्र करण्यासाठी लेखी पत्र आणावे आम्ही तसे करू असे उत्तर दिले. गावातील कोणत्याही लाभार्थ्याला शासनाचे नियम जीआर डाउनलुन घरकुलाचा लाभ दिलेला नाही असे उत्तर दिले. सचिन गायके यांनी उपस्थित केलेले मुद्दे बिन बुडाचे असून त्यांनी पुराव्या निशी आरोप करावे व तसेच पुरावे ग्रामपंचायतकडे सादर करावे असेही काही नागरिकांनी म्हटले आहे. शासनाचे नियम जीआर डाउनलुध खोटे कामे ग्रामपंचायतीला भाग पाडण्याचा गावातील ग्रामपंचायतीचे कर्मचाऱ्यांसह नागरिक प्रयत्न करत आहेत. गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात सदरचे ग्रामपंचायत कर्मचारी यांनी ग्रामपंचायती सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून खोटे नाते कामे करून घेतले आहे. असे पुरवे सध्या समोर आले आहे. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी व काही नागरिकांनी बिन बुडाचे आरोप करू ग्रामपंचायतला बेकायदेशीर कामे करण्यास लावू नये असेही काही नागरिक यांनी सुचविले आहे. तसेच रोहिले बुद्रुक गावठाण हे खारी बृहत लघु सिंचन तलाव तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद प्रकल्पात बुडीत गेल्याने या गावाचे नवीन गावठाण पुनर्वसन झाले आहे. या नवीन गावठाणा मध्ये भूखंड (प्लॉट) माननीय जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनी वाटप केले असून सदर भूखंडाचे खरेदी विक्री पूर्वपरवानगी असल्याशिवाय करण्यात येऊ नये असे आदेश रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीला दिले आहेत. त्यामुळे गेल्या दहा वर्षात मागील ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामसेवक व ग्रामपंचायत यांनी कोणत्याही प्रकारचे भूखंड दुसऱ्या व्यक्तीच्या नावे केले नाही. आणि आज तेच मागील सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत कर्मचारी हे येथील नागरिकांना भडकावून ग्रामपंचायतीला खरेदी विक्री केल्यानंतर 8 च्या उताऱ्यात फेरबद्दल करण्यास भाग पाडत असून तशा प्रकारचा अर्ज ग्रामपंचायतीकडे दिला असल्याचे समजते. परंतु सदरच्या ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी यांनी शासनाचा नियम आदेश डावलून काही राजकीय नागरिक व कर्मचाऱ्यांच्या भुलथापाला बळी पडून शासनाची खरेदी विक्रीची पूर्व परवानगी शिवाय ग्रामपंचायतच्या नमुना नंबर 8 मध्ये बदल केल्यास किंवा ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व काही ग्रामपंचायत सदस्यांवर दबाव टाकून काम करण्याचा प्रयत्न केल्यास ग्रामपंचायत अधिकारी यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी तक्रार करू अशी माहिती समोर आली आहे. काही राजकीय व्यक्तीने तर असा प्रश्न उपस्थित केला की भूमिगत गटार कशासाठी कोणामुळे केल्या असा प्रश्न उपस्थित केला. म्हणजेच विकास काम का केली असा अर्थ याचा होतो. रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतच्या विकास कामाला अडथळे आणणाऱ्या राजकीय व्यक्तींना काय साध्य करावयाचे आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात मागील सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी कोणती विकास कामे केली. विकास कामांच्या नावाखाली रकमा काढल्या परंतु कामे केली नाही असे उदाहरणे आहेत. तसेच येथील ग्रामपंचायत रोहिले बुद्रुक ते जिरी रस्ता केला. हे काम कोणी केले? रस्त्याचे काम पूर्ण केले का? रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्या का खोदल्या नाहीत? या रस्त्याचे कामाचे बिले कोणी काढले? कोणाच्या नावे काढले? या रस्त्याच्या कामाच्या नावाखाली लाखो रुपये काढले गेले यावर रोहिले बुद्रुक येथील नागरिक का बोलत नाही यावर चर्चा का करत नाही. कोणाच्या दबावाखाली दबलेले आहेत. आणि खरे केलेल्या कामावर बोलत आहे असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते मुक्ताराम बागूल उपस्थित केला आहे. तरी रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीचे ग्रामसभेत नागरिकांनी दिलेल्या प्रत्येक अर्जाची कसून चौकशी करून तक्रार अर्जदाराकडून पुरावे ताब्यात घेऊन बेकायदेशीर असलेल्या वर कारवाई करण्यास भाग पाडू असेही सामाजिक कार्यकर्ते मुक्ताराम बागूल यांनी पुढे म्हटले आहे. सदरच्या ग्रामसभेत आलेल्या तक्रार अर्जाची ग्रामपंचायत काय दखल घेते याकडे रोहिले बुद्रुक येथील नागरिकांचे लक्ष लागून आहे.
