
मालेगाव (प्रतिनिधी) : येथील सुप्रसिध्द राष्ट्रीय कवी, लेखक व समीक्षक संजय मुकूंदराव निकम यांच्या मेरा भारत, जय माॅं भारत, छत्रपती संभाजी या तीन हिंदी कवितांची आंतरराष्ट्रीय हिंदी साझा संकलन ‘मन का किनारा’ या पुस्तकासाठी विशेष निवड करण्यात आली. त्यांच्या ‘मेरा भारत’ या हिंदी काव्यसंग्रहाने जगभर ख्याती मिळवली आहे.आंतरराष्ट्रीय हिंदी कवी विवेक बादल बाजपुरी यांनी काढलेल्या या आंतरराष्ट्रीय हिंदी काव्यसंग्रह मन का किनारा यात राष्ट्रीय कवी संजय निकम यांच्या मेरा भारत, जय माॅं भारत, छत्रपती संभाजी या कवितांना वाचकांनी विशेष पसंती दिली. याबद्दल त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक होत आहे. त्यांना देशभरातून याबद्दल शुभेच्छा संदेश येत आहे. आंतरराष्ट्रीय कवी विवेक बादल बाजपुरी यांनी राष्ट्रीय कवी संजय यांचा गौरव करुन त्यांना ‘मन का किनारा’ या पुस्तकाच्या काही प्रती आणि विशेष सन्मान पात्र देऊन त्यांचा सत्कार केला आहे. या पुस्तकाचे संपादन विवेक बाजपुरी यांनी केले आहे. विधा प्रकाशन दिल्ली, उत्तराखंड यांनी मन का किनाराचे प्रकाशन केले आहे. ‘मन का किनारा’ हा आंतर राष्ट्रीय हिंदी साझा संकलन कविता संग्रहात देशभरातील ३५ कवींनी आपल्या कविता पुस्तकासाठी पाठविल्या आहेत. त्यांनाही सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.
