
नांदगाव -( प्रतिनिधी )मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयातील शिक्षिका व विद्यार्थीनी नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री दिगंबर भदाणे व पोलीस बांधवांना हर घर तिरंगा अभियानांतर्गत राख्या बांधण्यात आल्या. याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी पोलीस बांधवांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाल्या की, पोलीस बांधवांमुळे आज आपण सुरक्षित आहोत. अहोरात्र जनतेच्या सेवेसाठी ,सुरक्षितेसाठी कायम बांधिल असतात. आपण देखील पोलीस बांधवांचा आदर केला पाहिजे. पोलीस बांधवांना देखील आपले कुटुंब ,परिवार असतो तरी पण ते सदैव आपल्या सुरक्षितेसाठी कार्यतत्पर असतात. पोलीस निरीक्षक श्री दिगंबर भदाणे म्हणाले की, ही संकल्पना आम्हाला एक भावनिक आधार देऊन गेली. आजचा हा प्रसंग परत आमचं मनोबल उंचावण्यासाठी मदत करेल.*सद्रक्षणाय खलनिग्रहणाय*” या उक्तीप्रमाणे आम्ही कायम तत्पर आहोत असे आश्वासन दिले. याप्रसंगी उपमुख्याध्यापक दीपक चव्हाण ,पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व अशोक मार्कंड, सुनिता निकम, गीतांजली मोरे, जया गवळी ,कल्पना अहिरे, स्मिता केदारे, सुनिता बिडवे, सायली पाटील, सुभाष शेळके, संजय पवार व पोलीस बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद आहेर यांनी केले.
