
नांदगाव -दि 7ऑगस्ट 2025 नांदगाव येथील जे.टी कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कुल व सौ.क.मा कासलीवाल माध्यमिक व प्राथमिक विद्यालय येथे स्व. माणिकचंदजी कासलीवाल यांचा 25 वा भावांजली समारोह संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्राचार्य श्री. मणी चावला यांच्या ‘पापा’ या विषयावरील सुंदर कविता वाचनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल सावंत यांनी करताना माणिकचंद कासलीवाल यांच्या कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व भगवान महावीर,माता सरस्वती व स्व.माणिकचंद कासलीवाल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला

.याप्रसंगी कासलीवाल परिवाराच्या आत्या श्रीमती शांताबाई पाटणी या उपस्थित होत्या. आपले मनोगत व्यक्त करताना भावाच्या आठवणींत त्या भावूक झाल्या.जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थिनी कु. अनया चोपडा हिने आपल्या मनोगतातून स्व. माणिकचंदजी कासलीवाल यांच्या स्मृतींना उजाळा दिला. विद्यालयातील शिक्षक विजय गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना माणिकचंदजी कासलीवाल यांनी नि:स्वार्थी भावनेने सामाजिक कार्य केले. तसेच त्यांनी राजकीय, सामाजिक व शैक्षणिक ,व्यापार अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला.जीवनात ज्यांचा आदर्श घ्यावा, ज्यांच्या पाउलखुणा जपाव्यात असे थोर व्यक्तिमत्व नांदगावच्या भूमीला लाभले हे आपले भाग्यच आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले.त्यांच्या धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याच्या आठवणी जाग्या केल्या. या कार्यक्रमा निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना A.R.E.A.S फाउंडेशन तर्फे शून्य सर्पदंश जनजागृती व मानव बिबट सहजीवन जनजागृती अभियाना अंतर्गत सुशांत रानशोर व त्यांच्या टीमने मोलाचे मार्गदर्शन केले.

संस्थेचे चेअरमन सुनीलकुमार कासलीवाल संस्थेचे उपाध्यक्ष सुशीलकुमार कासलीवाल,सचिव -विजय चोपडा,प्रमिलाताई कासलीवाल विश्वस्त रिखबचंद कासलीवाल, महेंद्र चांदीवाल, जुगलकिशोर अग्रवाल तसेच श्रीमती शोभाकाकीजी कासलीवाल, अंकुर कासलीवाल प्रतिक कासलीवाल,अभिजित कासलीवाल,प्रिन्सिपल मनी चावला मुख्याध्यापक श्री. विशाल सावंत, गोरख डफाळ, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी रावअंदोरे व योगिता गायकवाड यांनी तर सिद्धार्थ जगताप यांनी आभार व्यक्त केले.
