
नाशिक (प्रतिनिधी)सिन्नर तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित असलेले दानशुर असे दातली गावचे भूमिपुत्र *डॉ.भरतजी गारे* यांनी वडील *स्व.हरी दादा गारे* यांच्या स्मरणार्थ *दोन लाखांची* विद्यालयाच्या नावे बँकेत कायम ठेव ठेवली असून येणाऱ्या व्याजातून हुशार व गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप केले जाते.या वर्षी १५०००(पंधरा हजार रुपये) किमतीचे २५ गणवेशाचे वाटप डॉक्टरांचे बंधू चंद्रभान गारे,शालेय समिती चेअरमन ह.भ.प पंढरीनाथ आव्हाड व प्राचार्य इ.के. भाबड यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरण करण्यात आले.यामुळे गणवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.आपण समाजाचे देणे लागतोया उक्तीप्रमाणे डॉ.भरतजी गारे नेहमीच मदतीचा हात देण्यासाठी पुढाकार घेत असतात. *परोपकाराय दर्द मित शरीरं* म्हणून दातली पंचक्रोशीतील होतकरू तरुणांसाठी स्वतःच्या योगदानातून अद्यावत अभ्यासिका उभारून अनेक विद्यार्थी अभ्यास करून यशस्वी झाले आहेत…. *मला अधिकारी व्हायचे* या उपक्रमाच्या माध्यमातून सिन्नर तालुक्यातील अनेक शाळांमध्ये जाऊन डॉ.भरत गारे मार्गदर्शन व मदत करतात, ज्ञानदानाचे हे पवित्र कार्य अतिशय प्रेरणादायी व स्तुत्य असून अशा परोपकारी दृष्टिकोनाबद्दल दातली विद्यालय नेहमी डॉक्टरांबद्दल कृतज्ञ असे प्राचार्य एकनाथ भाबड यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक विद्यालयाचे प्राचार्य एकनाथ भाबड यांनी केले.सूत्रसंचालन नवनाथ सानप यांनी केले याप्रसंगी कार्यक्रमास पालक , विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
