
दै. अक्षराचे नाशिक जिल्हा प्रतिनिधी सुनील क्षिरसागर
विंचूर (प्रतिनिधी) : विंचूर येथील दै. अक्षराचे नाशिक जिल्हा प्रतिनिधी सुनील क्षिरसागर यांना दै.अक्षराज मीडिया परिवाराचे मुख्य संपादक विनोदजी गोरे व सहसंपादिका प्राजक्ता गोरे यांच्याकडून दै.अक्षराजच्या वर्धापन दिनानिमित्त व १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त “उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार” जाहीर झाला आहे. तो लवकरच गुरुवार दि.१४ ऑगस्ट २५ रोजी श्री क्षेत्र आळंदी येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या दै.अक्षराज मीडिया परिवाराच्या वतीने सुनील क्षिरसागर यांची निवड करण्यात आलेली आहे. ते गेल्या चार वर्षापासून अक्षराज मीडिया मध्ये कार्यरत आहे. तसेच आतापर्यंत त्यांना अनेक छोटे- मोठे पुरस्कार मिळाले आहे. ते अकरा वर्षापासून पत्रकार क्षेत्रात यशस्वी काम करत आहे. त्यांनी अनेक सामाजिक विषयाला वाचा फोडली आहे, तसेच सामाजिक क्षेत्रात व शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
विंचूर येथील कांदा मार्केट कमिटी तर्फे नुकताच त्यांचा सत्कार करण्यात आला

