
नाशिक (प्रतिनिधी )स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित, श्रीमान टीजे चौहान मोरवाडी या शाळेतील विद्यार्थिनींनी एक आगळावेगळ्या प्रकारचे रक्षाबंधन साजरे केले.. विद्यालयातील इयत्ता पाचवी सहावीच्या विद्यार्थ्यांनी हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत स्वतः घरून राख्या बनवून आणल्या होत्या व त्या राख्या वडनेर गेट देवळाली कॅम्प या ठिकाणी आपल्या देशाचे रक्षण करणारे व कर्तव्य बजावणारेदेश सैनिक यांना त्या राख्या बांधून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यामध्ये मेजर सचिन मुंडे त्याचबरोबर मेजर दिनेश कस्तुरे व त्यांच्या सहकारी यांना या राख्या बांधून त्यांना त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. सदर उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला माळी मॅडम व पर्यवेक्षक श्री कीर्ती कुमार गहाणकरी सर यांचे मार्गदर्शन लाभले. सदर उपक्रमासाठी यशवंत गावित,श्रीकांत सुरसे सर, रूपाली महाले मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
