
*सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९९० वा दिवस*
वस्तू जितकी जास्त जवळ, तितकीच तिची जाणीव आपल्याला कमी होते. आत्मा हा अधिकाधिक जवळ आहे, त्यामुळेच असंयत, चंचल चित्ताच्या व्यक्तीला याचा सुगावाही लागत नाही. पण मन वशीभूत असलेला शांत जितेंद्रिय आणि विवेकशील मनुष्य बाह्य जगताची उपेक्षा करून अंतर्जगात प्रवेश करतो व कालांतराने या आत्म्याच्या महिम्याची उपलब्धी करून घेतो. अखेर महान होतो. तेव्हाच त्याला आत्मज्ञान लाभते व मीच तो आत्मा आहे ‘तत्वमसि श्वेतकेतो’ वगैरे वैदिक महाकाव्यांची त्याला प्रत्यक्ष अनुभूती होते.
*स्वामी विवेकानंद…* *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*

*★ भारतीय सौर १६ श्रावण (नभमास) शके १९४७*
★ श्रावण शुध्द /शुक्ल १३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. ७ ऑगस्ट २०२५ ★ संत नरहरी सोनार महाराज जयंती
★ बृहस्पती पूजन
★ १९२५ भारतीय शेतीतज्ञ, हरितक्रांतीचे जनक आणि माजी केन्द्रीय कृषी मंत्री पद्मश्री, पद्मविभूषण व पद्मविभूषण डॉ. मनकोम्बू साम्बसिवन तथा एम. एस. स्वामीनाथन यांचा जन्मदिन
★ १९४१ जागतिक कीर्तीचे कवी, साहित्यिक, तत्वज्ञ, शिक्षणतज्ञ, पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांचा स्मृतिदिन.
★ गुरुदेवांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन…
