
कासारी (प्रतिनिधी )व्ही. जे. हायस्कूल नांदगाव येथील मार्च १९८२ च्या इ. १० वीच्या मैत्री गृप तर्फे माध्यमिक विद्यामंदिर कासारी येथिल गरजू व गरीब होतकरू २९ विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, बुट, दप्तर यांचे वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रमासाठी श्री. नंद सर, श्री. प्रकाश थोरात, श्री. सुदाम खैरनार सर, श्री. संजय मोकळ व श्री. पवन रायबागकर तसेच दिलीप इपर हे मैत्री गृपचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमास व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे संचालक श्री. डोंगरे सर. श्री. थोरे सर. शाळेचे मुख्याध्यापक श्री. जाधव सर व आमचे मित्र श्री मोहन चकोर सर त्यांचे सहकारी शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
