
देवळाली कॅम्प येथील महाराष्ट्र बुक डेपोचे संचालक निलेश गायकवाड यांच्यावतीने नासाका विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य प्रदान करताना अण्णाज टेम्पल हिल ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य प्रा.संजय आढाव आणि संग्राम करंजकर, मुख्याध्यापक अरुण पगार आदी.
नाशिकरोड:- देवळाली कॅम्प येथील महाराष्ट्र बुक डेपोचे संचालक आणि अण्णाज टेम्पल हिल ग्रुपचे क्रियाशील सदस्य निलेश गायकवाड यांनी पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना कंपासपेटी प्रदान करत दातृत्वाचा वसा जपला. नासाकाचे अवसायक प्रदीप आव्हाड आणि नाशिक सर्व सेवाभावी ट्रस्टचे मानद व्यवस्थापक सुधाकर गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या सोहळ्यात देवळाली कॅम्पच्या अण्णाज टेम्पल हिल ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य प्रा.संजय आढाव आणि संग्राम करंजकर, मुख्याध्यापक अरुण पगार यांच्या हस्ते ह्या कंपासपेटी प्रदान करण्यात आल्या. प्रमुख पाहुणे प्रा.संजय आढाव यांनी अण्णाज टेम्पल हिल ग्रुपच्या विधायक उपक्रमांचा आढावा घेऊन ग्रुप करत असलेल्या सामाजिक योगदानाची माहिती दिली आणि भविष्यातही विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले. मुख्याध्यापक अरुण पगार यांनी स्वागत केले. रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन करत आभार मानले.
