
नामपूर (प्रतिनिधी ,) येथील समाजश्री प्रशांत दादा हिरे कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान छंद मंडळाचे अत्यंत उत्साहात उदघाटन पार पडले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिनेश शिरुडे, उपप्राचार्य प्रा महेंद्र दासनूर व विज्ञान छंद मंडळाचे प्रमुख प्रा डॉ आनंद जोशी यांनी संयुक्तपणे उदघाटन केले.या प्रसंगी प्राचार्य शिरुडे यांनी मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारून समाज प्रगतिशील होण्यासाठी आपले योगदान देण्याची आवश्यकता प्रतिपादित केली. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक प्रवृत्ती शोधण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक करत असलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.या प्रसंगी प्रमुख व्याख्याता म्हणून मार्गदर्शन करतांना प्रा डॉ आनंद जोशी यांनी भारतीय समाजामधील प्राचीन काळापासून वेद वाग्मयातील वैज्ञानिक संकल्पनांचा उहापोह करत प्राचीन भारतीय समाजातील अनेक प्रथा परंपरांमागील वैज्ञानिक कारणांचा दाखला दिला व ज्ञाना तुन विज्ञान कसे जन्मते हे सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. उपप्राचार्य प्रा महेंद्र दासनूर यांनी याप्रसंगी विज्ञान छंद मंडळ स्थापण्यात विद्यार्थ्यांच्या कार्यशील सहभागाचा उल्लेख करतांना छंद मंडळास शुभेच्छा दिल्या. प्रा अमित सोनावणे यांनी ही अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना विज्ञानाची संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगितली या वेळी विद्यार्थी-विद्यार्थिनी समृद्धी पवार, ऋतुजा धोंडगे, श्रेया वाणी, जयेश अहिरे, कुणाल पगार, चैताली पवार, संजना दाणी व अनुष्का परदेशी यांनी समयोचित भाषणे केलीत.या कार्यक्रमाचे प्रास्थाविक प्रा संदीप निकम यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा घनश्याम निकम यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्या करिता प्रा रावसाहेब देसले, प्रा सोमनाथ महाले, प्रा मुकेश भामरे, प्रा तुकाराम पाटील, प्रा महेश खैरनार यांनी परिश्रम घेतले राष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
