
टाकली बु!! ( प्रतिनिधी ) मराठा विद्या प्रसारक समाज संचलित जनता विद्यालय टाकळी बुद्रुक या शाळेमध्ये विद्यार्थिनींच्या आरोग्य विषयक समस्या व जागरूकता या विषयाला अनुसरून आरोग्य विषयक मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मराठा विद्या प्रसारक संस्थेतील नांदगाव ओपीडीच्या कार्य कुशल डॉक्टर प्रज्ञा पगार मॅडम ह्या होत्या तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा पाटील यांनी केले. “आरोग्यम् धनसंपदा” या उक्तीनुसार स्त्रीचे आरोग्य हे पाठीच्या कण्यासारखे असते तसेच माणूस निरोगी असेल तर सामाजिक आर्थिक भावनिक सर्व गोष्टींचा समन्वय साधता येतो असे त्या म्हणाल्या.
डॉक्टर प्रज्ञा मॅडम यांचे सर्व विद्यार्थिनींना मार्गदर्शन लाभले त्यांनी आरोग्य विषयक समस्या व त्यावरील उपाय योजना कशा कराव्यात भविष्यात येणाऱ्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या कशा सोडवाव्यात किंवा त्यांना कसे सामोरे जावे. तान तणावाचे व्यवस्थापन कसे करावे तसेच आरोग्य विषयक अनेक बाबी त्यांनी स्पष्ट केल्या. कार्यक्रमाचा समारोप विद्यालयातील उपशिक्षिका पी.सी .राजपूत यांनी केले
