
चास (प्रतिनिधी ) चास, तालुका- सिन्नर, जिल्हा- नाशिक येथे चिंच झाडी- 250 जांभूळ- 300 झाडांचे रमेश पांडुरंग भाबड सर खंबाळे यांनी तीन वर्षांपूर्वी चिंचेची झाडे यांचे वृक्षारोपण केले होते. आज ती झाडे एकदम चांगल्या परिस्थितीमध्ये पर्यावरणाला रक्षणाला पुरक ठरलेली आहे सरांनी घेतलेला हा वसा पर्यावरण पूरक आहे तसेच पारंपारिक शेतीतून आधुनिक शेतीकडे वळण्याजोगता आहे सर्व पर्यावरण प्रिय लोकांकडून सरांनी केलेल्या वृक्षारोपण कार्याचे कौतुक होत आहे त्यांची दोन मुले आहेत अविनाश रमेश भाबड व सौरभ रमेश भाबड दोघी इंजिनियर आहेत त्यांचा संकल्प अजून 1000 ते 2000 झाडे लावण्याचा आहे.रमेश पांडुरंग भाबड सर हे श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ खंबाळे येथे कार्यरत आहेत.

