
*मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्रातील ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आणि छायाचित्रकारांना प्रेरणा देण्यासाठी श्री शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनॅशनल) संस्थेच्या वतीने फोटोग्राफी स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी दोन वेगवेगळ्या थीम निश्चित करण्यात आल्या आहेत – “युनेस्को हेरिटेज १२ किल्ले” आणि “महाराष्ट्रातील इतर किल्ले”. या माध्यमातून छायाचित्रकारांना ऐतिहासिक गडकोटांचा भव्यतेसह गौरव करण्याची संधी मिळणार आहे.स्पर्धेसाठी प्रवेश अर्ज १ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झाले असून, ३१ ऑगस्ट २०२५ ही नोंदणीची अंतिम तारीख आहे. प्रत्येक थीमनुसार स्वतंत्र पारितोषिके देण्यात येणार असून त्यामध्ये पहिला क्रमांक ₹५,०००/-, दुसरा क्रमांक ₹३,०००/-, तिसरा क्रमांक ₹२,०००/-, तर प्रोत्साहनपर पारितोषिक ₹१,०००/- असे आकर्षक रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. निकाल ८ सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर केला जाईल आणि पारितोषिक वितरण समारंभ १५ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील Google Form भरावा – https://forms.gle/Bv1KJN1Dk9UiYPRr8अधिक माहितीसाठी किंवा शंका असल्यास युक्ता गोठणकर यांच्याशी 8591747565 / 8691973874 या क्रमांकांवर संपर्क साधावा. इतिहास आणि छायाचित्रकलेचा संगम साधणारी ही स्पर्धा छायाचित्रकारांसाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे. तर चला गडकोटांचे वैभव तुमच्या नजरेतून जगाला दाखवा!
