
नाशिक (प्रतिनिधी )स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित श्रीमान टी.जे. चौहान बिटको माध्यमिक विद्यालय मोरवाडी येथे आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत अग्निशमन प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली यावेळी अग्निशमन दलाचे अधिकारी . मोहन मधे, अर्शद पटेल, मुख्याध्यापिका उज्वला माळी ,पर्यवेक्षक कीर्तीकुमार गहाणकरी ,अग्निशमन दलाचे पदाधिकारी पर्यावरणदूत पुरस्कारप्राप्त शिक्षक प्रदीपसिंह पाटील आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी प्रात्यक्षिकामध्ये अग्निशमन करण्याचे विविध उपाय, त्याचबरोबर आपत्तीचे प्रकार व घरगुती आपत्ती आल्यानंतर घ्यावयाची काळजी याबाबतचे मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. व अग्निशमन करण्यासाठी पाण्याचा वापर याबाबत वेगवेगळी प्रात्यक्षिके दाखवण्यात आली व आपत्ती ग्रस्त भागात घ्यावयाची दक्षता याबाबत पटेल व मधे यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली .आपत्ती व्यवस्थापन प्रमुख लैलेश नाईक यांनी सूत्रसंचालन केले.

आपत्तीव्यवस्थापन समितीतील सर्व सदस्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
