
*सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८४४ वा दिवस* केवळ चाळीस लक्ष ब्रिटिशांनी तीस कोटी भारतीयांवर साम्राज्य गाजविलेच कसे? याची मानसशास्त्रीय मीमांसा काय? चाळीस लक्षांनी आपल्या इच्छाशक्ती एकवटल्या आणि त्यातून अतुल्य शक्ती निर्माण झाली. आणि ते तीस कोटी होते त्यांच्या शक्ती मात्र विखुरलेल्या होत्या. एक ह्रदय होणे हे संघटनेचे रहस्य आहे. संघटना, सर्व शक्तींचे एकत्रीकरण हेच उद्याच्या हिंदुस्तानच्या बांधणीचे प्राणसूत्र आहे. हिंदुस्तानचे ऐक्य म्हणजे त्यांच्या विखुरलेल्या अध्यात्मिक शक्तींचे ऐक्य, राष्ट्रीय ऐक्य होय. *स्वामी विवेकानंद…* *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर २२ फाल्गुन शके १९४६*
★ फाल्गुन शुध्द /शुक्ल १४ पौर्णिमा ★ शालिवाहन शके १९४६
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२६
★ गुरुवार दि. १३ मार्च २०२५ ★ हुताशनी पौर्णिमा होळी
★ संत दामाजी पंत पुण्यतिथी, मंगळवेढा
★ १८०० पेशव्यांच्या दरबारात असणारे मराठा साम्राज्यातील, मुत्सद्दी, साडेतीन शहाण्यापैकी अर्धे शहाणे बाळाजी जनार्दन भानू ऊर्फ नाना फडणवीस यांचा स्मृतीदिन
★ १९४० अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची उधमसिंग यांनी गोळया घालून हत्या केली.
★ होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा, दुःख, दारिद्र्य, आळस, द्वेष, मत्सर यांचे दहन होवो.
★ हुताशनी पौर्णिमा होळी, शिमगा सणाच्या हार्दिक शुभेच्छा.


