
मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या प्रतिमा पूजन प्रसंगी प्राचार्य दवंगे, उपमुख्याध्यापक परदेशी व सर्व सेवक
मौजे कसबे सुकेणे ( प्रतिनिधी )ता 13- मौजे सुकेणे ता निफाड येथील कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थेचे आद्य संस्थापक कै कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे होते सुरुवातीला प्राचार्य दवंगे, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी यांच्या हस्ते कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी विद्यार्थी व शिक्षक यांनी मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य दवंगे यांनी कर्मवीर थोरात यांनी तत्कालीन परिस्थितीत बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य उराशी बाळगून संस्थेच्या उभारणीसाठी दिलेले योगदान व त्यांचे कार्य याविषयी माहिती करून दिली प्रास्ताविक बाळासाहेब गडाख यांनी केले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते
