
नाशिक (प्रतिनिधी):–संपूर्ण महाराष्ट्रात सर्व समाजघटकांचे प्रश्न यशस्वीरित्या मार्गी लावण्यासाठी *राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे व महाराष्ट्रातील समस्त नेते पदाधिकारी कार्यकर्ते* जोमाने काम करीत आहे. *अण्णासाहेब कटारे यांच्या निर्भीड, कर्तृत्वान स्वाभिमानी नेतृत्वाला प्रभावित होऊन आदिवासी समाजातील अनेक युवकांनी आज राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांची त्यांचे केंद्रीय कार्यालय नाशिक येथे भेट घेतली.

युवकांचा मोठा मेळावा घेऊन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले.लवकरच नाशिक मध्ये भव्य प्रवेश सोहळा आयोजित करणार असल्याचे *युवा नेतृत्व बिपिन कटारे* यांनी सांगितले.यावेळी *सुनील पवार,राहुल चौधरी, योहान सोनवणे,दिनेश मालचे,दीपक बागुल,दीपक पवार* आदी उपस्थित होते.
