
नाशिक (प्रतिनिधी) : दि.महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक्स् फेडरेशन, मुंबई व नाशिक जिल्हा को-ऑप. बँक्स् असोसिएशन, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने इंटरप्रिटेशन ऑफ फिनान्शिअल स्टेटमेंट व अॅसेट व लायबिलिटी मॅनेजमेंट या विषयांवर प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात उत्तर महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकांचे प्रतिनिधी कार्यशाळेसाठी उपस्थित होते. ही कार्यशाळा विश्वास बँक डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास बँकेसमोर, स्वातंत्र्यवीर सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे सदर कार्यशाळा संपन्न झाली. इंटरप्रिटेशन ऑफ फिनान्शिअल स्टेटमेंट, अॅसेट व लायबिलिटी मॅनेजमेंट या विषयावर बोलतांना सी.ए. धनंजय गोखले यांनी सेक्शन 56 (झेडआय) अन्वये नागरी सहकारी बँकांसाठी या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच कॅश फ्लो स्टेटमेंटवर अकाऊंट स्टॅण्डर्ड 3 प्रमाणे नोट्स ऑन अकाऊंट तसेच डिसक्लोजर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नियम भागभांडवलाबाबत तसेच यावर मार्गदर्शन केले. नाममात्र सभासद, शेअर्स लिंकिंग किती टक्के असावा, रिझर्व्ह अॅण्ड प्रोव्हिजन याविषयी माहिती दिली. श्री मोहनजी टांकसाळे यांनी असेट व लायबिलिटी मॅनेजमेंट या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. कॉस्ट ऑफ डिपॉझिट ऑप्टिमाईज अॅण्ड यिल्ड मॅक्झीमाईज बाबत तसेच शाखा पातळीवरील आवश्यक नफा, कासा डिपॉझिट, कास्ट टु इन्कम रेशोबाबत अभ्यासपूर्ण माहिती दिली. कार्यशाळेविषयी स्वागत व प्रास्ताविक करतांना दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स् फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रम्हेचा म्हणाले की, नागरी सहकारी बँकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे काळाची गरज आहे. त्यासाठी त्याचा स्वीकार करावा. व्यावसायिक बँकांच्या स्पर्धेत अद्ययावत व्हावे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कम्प्लायन्सबाबत जागरूकता बाळगावी. दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक्स् असोसिएशनचे संचालक तथा माजी अध्यक्ष विश्वास लिलावती जयदेव ठाकूर म्हणाले की, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर नजिकच्या भविष्यात वाढणार आहे. त्यामुळे कमीत कमी मनुष्यबळाचा वापर होईल. त्यासाठी तंत्रज्ञानाचा स्वीकार नागरी सहकारी बँकांना करावा लागणार आहे. म्हणूनच नागरी सहकारी बँकांनी दुरगामी विचार करावा व तंत्रज्ञानदृष्ट्या सक्षम व्हावे. कार्यक्रमास नाशिक जिल्हा बँक असोसिएशनचे कार्याध्यक्ष वसंत खैरनार, दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशनचे संचालक नानासाहेब सोनवणे, मिलिंद आरोळकर, चंद्रहास गुजराथी, रत्नाकर कदम, फेडरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सचिव प्रसाद पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनिषा पगारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन नानासाहेब सोनवणे यांनी केले. या कार्यशाळेला उत्तर महाराष्ट्रातील 52 बँकांचे 180 अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, अधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
