
निगडोळ (प्रतिनिधी):-रयत शिक्षण संस्थेचे मा.श.प.पवार माध्य.विद्यालय निगडोळ ता.दिंडोरी जि.नाशिक या विद्यालयात महसूल सप्ताह अंतर्गत सोमवार दि.४ऑगस्ट२०२५ रोजी छत्रपतीशिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबीर आयोजित करण्यात आले.मुख्याध्यापक बोरसे डी.डी. यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक कापडणीस एन.जे.यांनी शिबिराचे नियोजन केले. निगडोळ परिसरातील सेतू कार्यालयातील महत्त्वपूर्ण कागदपत्रांची जाण असलेले सेतू संचालक निलेश मालसाने यांना या शिबिरासाठी निमंत्रित करण्यात आले.विद्यार्थ्यांना जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला,वय अधिवास डोमॅसाईल सर्टिफिकेट इ.कागदपत्रे वेळेवर आणि अधिक श्रम वाया न घालता कशा पद्धतीने तत्पर मिळू शकतात याविषयी निलेश मालसाने यांनी सविस्तर प्रबोधन केले त्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही विद्यार्थ्यांना या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.मा.मुख्याध्यापकांनी गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार केला.विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन निलेश मालसाने यांनी योग्य पद्धतीने केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कापडणीस एन.जे.यांनी केले व आभार प्रदर्शन बेद्रे एस.व्ही.यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी पी.व्ही.गायकवाड मॅडम,ए.बी.वाघमारे,व्ही.ए.देवरे टी.व्ही भामरे यांनी अनमोल सहकार्य केले.
