
सिन्नर- (प्रतिनिधी ) तालुक्यातील डुबेरे येथील सत्यभामाबाई विष्णुपंत वाजे ( वय- ८६ वर्ष) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले.सायखेडा येथील जनता इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य रामदास विष्णुपंत वाजे यांच्या त्या मातोश्री होत्या.त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली ,सूना व नातवंडे असा परिवार आहे. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे निफाड तालुका संचालक शिवाजी आप्पा गडाख यांच्यात भगिनी होत्या. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन नारायण वाजे यांच्या त्या चुलती होत्या.
