
नांदगाव (प्रतिनिधी):- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव येथे कर्मवीर रावसाहेब थोरात यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापिका श्रीमती काळे मॅडम व उपमुख्याध्यापक श्री थेटे सर ,सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली.व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षीय मनोगतात श्रीमती काळे मॅडम म्हणाले, कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला *बहुजन हिताय, बहुजन सुखाय* या ब्रीद वाक्य अंगीकारून कर्मवीर रावसाहेब थोरात यांनी बहुजन सेवा हीच ईश्वर सेवा जाणून शिक्षण संस्था हेच आपलं कुटुंब समजून बहुजन समाजाच्या मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी मविप्र शैक्षणिक संस्था उभी करण्यात मोठा वाटा, कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा आहे हे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
