
नाशिक (प्रतिनिधी ) नाशिक येथील विभागीय क्रीडा संकूलात आयोजीत स्पर्धेत नाशिक जिल्हा , अहिल्या नगर जिल्हा , धुळेजिल्हा , मुंबई जिल्हा, ठाणे जिल्हा या मातब्बर संघा चा समावेश होता. या संघचा पराभव करत नाशिक येथील डे केअर सेंटर शाळेच्या संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला. ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ल. जी उगावकर सचिव गोपाळ पाटील, सह सचिव अंजली पाटील, सदस्य अनिल भांडारी, अजय ब्रम्हेच्या, अलका ताई निखाडे, मुख्याध्यापिका अनुजा पाठक यांनी अभिनंदन केले, संघातील खेळाडू वरद उगले, साई जोंधळे, ñसार्थक बिरार, नैतिक वाघमारे, समर्थ कटारे, ओंकार तांबट, ओम शिंदे, सोहम मोहिते, साहिल डोंगरे, सोहम जाधव, निलेश किरगे, हसीम पठाण यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले व तृतीय क्रमांकाची ट्रॉफी पटकविली, क्रीडा शिक्षक बाळासाहेब रणशूर यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.
