
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९८७ वा दिवस अनादि, अनंत, अविनाशी, शुद्ध, सात्विक, सर्वशक्तिमान व सर्वव्यापी आहे असा आत्मा प्रत्येकाच्या ठायी विद्यमान आहे. आपण महान कार्य करण्यासाठीच जन्माला आलो आहोत असा आत्मविश्वास प्रत्येकात असला पाहिजे. तुम्ही कमकुवत आहात, दुर्बल आहात, तुम्ही काहीच करू शकणार नाही. असे तुम्हाला नेहमी शिकविण्यात आले. त्यामुळे तुम्ही दिवसेंदिवस कूचकामाचे बनत आहात. गुढवाद, गुप्त विद्या या भय उत्पन्न करणार्या गोष्टी तुमच्या मनात शिरल्या आहेत. आपल्याला सामर्थ्य हवे आहे. आत्मविश्वास हवा आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती हवी आहे.
स्वामी विवेकानंद…
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १३ श्रावण (नभमास) शके १९४७
★ श्रावण शुध्द /शुक्ल १०
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. ४ ऑगस्ट २०२५
★ द्वितीय श्रावण सोमवार ‘शिवमूठ’ – तीळ
★ १७३० पानिपतच्या तिसऱ्या युद्धातील मराठ्यांचे सरसेनापती सदाशिवराव भाऊंचा जन्मदिन.
★ १८४५ स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, कायदेपंडित, राजकीय नेते, उत्तम प्रशासक, काँग्रेसचे एक संस्थापक सर फिरोजशहा मेहता यांचा जन्मदिन.
★ १८९४ प्रसिध्द साहित्यिक, वक्ते नारायण सिताराम तथा ना. सी. फडके जन्मदिन.
★ १९२९ पार्श्वगायक, गीतकार, संगीतकार, पटकथालेखक, विनोदी अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक आभासकुमार गांगुली तथा किशोर कुमार यांचा जन्मदिन.
