
निफाड (प्रतिनिधी)- सहकार महर्षी त्रंबकराव घुगे गुरुजी भाग्यश्री ग्रामीण बिगर शेती पतसंस्था मर्या निफाड या संस्थेचा 20 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला दरवर्षी सहकार महर्षी त्रंबकराव घुगे गुरुजी पुण्यतिथी निमित्ताने दिला जाणारा आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा या निमित्ताने संपन्न झाला निफाड येथील रुद्रय बँक्वेट हॉल येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह भ प संजय नाना धोंडगे होते सुरुवातीला प्रास्ताविकातून संस्थेचे चेअरमन रमेशचंद्र घुगे यांनी कार्यक्रमाचा हेतू व उद्देश स्पष्ट करत उपस्थितांचे आभार मानून आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले यावेळी प्रमुख वक्ते आचार्य तुषार भोसले, मविप्र सभापती बाळासाहेब क्षीरसागर, डॉ आत्माराम कुंभार्डे यांनी संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन केले यावेळी वि दा व्यवहारे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार तर बाळासाहेब क्षीरसागर,कोंडाजी आव्हाड,डॉ आत्माराम कुंभार्डे,माणिकराव बोरस्ते,राजाराम धनवटे, शंकरराव वाघ यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले

कार्यक्रमासाठी शिवाजी आप्पा गडाख, दिगंबर गीते,शिवाजीराव ढेपले, मधुकर शेलार आदींसह सभासद व हितचिंतक, कर्मचारी आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे चेअरमन रमेशचंद्र घुगे, व्हा चेअरमन खंडेराव चव्हाण, रामदास सानप, विठ्ठल गचाले, डॉ शैलाजा आव्हाड,राजाभाऊ नागरे, राधाकिसन हाडपे, ॲड चेतन घुगे, डॉ राजेश कांगणे, हरिभाऊ कदम,दीपक आहेर, रामदास सुरवाडे, शीला कुयटे, वैशाली गायकवाड, अविनाश चव्हाण, तनवीर राजे आदींनी विशेष परिश्रम घेतले सूत्रसंचालन श्री सुरुळेकर सर यांनी तर आभार संचालक ॲड चेतन घुगे यांनी मानले
(फोटो- सहकार महर्षी त्र्यंबकराव घुगे भाग्यश्री ग्रामीण बिगर शेती पतसंस्था निफाड वर्धापन दिनप्रसंगी आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा प्रसंगी उपस्थित मान्यवर)
